Jay Lahuji

Saturday 27 April 2019


'कपिल सरोदेवर गुन्हा दाखल करा.'

 मुक्रमाबाद:- कंधार तालुक्यतील शिरसी बु.येथील कपिल सरोदे हा पुणे येथे राहतो. या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल दि.२५ एप्रिल २०१९ रोजी सोशल मीडियावरून अवमान जनक भाष्य करून मातंग समाज बांधवांच्या भावना दुखावल्या व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना कमी लेखून अवमान केला. त्यामुळे समस्त मातंग समाज बांधवांच्या वतीने कपिल सरोदेवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी . अशी मागणी निवेदनाद्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.कमलाकर गड्डीमे साहेब यांना केली आहे. यावेळी जय लहुजी सामाजिक संस्थे चे राजरत्न बाजीराव गुमडे ,योगेश अभंग शिंदे,रामदास बोयेवार, बालाजी बोयेवार ,बालाजी कांबळे,सचिन कांबळे ,जगदीश कांबळे ,कृष्णा कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

#NaviMumbai #Airoli #Thane #Digha #YogeshAbhangShinde #jaylahujisamajik
#mahadgipr

No comments:

Post a Comment