Jay Lahuji

Tuesday 27 February 2018




कै. दुर्वेश प्रेमनाथ भोईर यांना प्रथम पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली..! कसे विसरु तुला,
तूच सांग कसे विसरु मी तुला...!
ठेऊन गेलास अशी आठवणं,
आता फक्त त्याची मनात साठवणं...!
तुझा तो हसरा चेहरा,
आठवत राहील सैरावैरा...!
तुझ्या बोलण्याची ती मोहक अदा,
मला लक्षात राहिलं सदा सदा...!
तुझे सर्वांशी आदराने वागणें,
आता अवघड वाटेल आम्हाला जगणे...!
तुझे ते सर्वांशी सौम्य बोलणे,
आता तेच आठवून नकळत रडणे...!
तुझ्या बरोबरचं नेहमी फिरणं,
कठीण जाईल मला ते दिवस विसरणं...!
तुझ्याशी असलेली माझी लगट,
तुझ्याशिवाय येईल माझ्या अंगलट...!
काय केले होते आम्ही मित्रानी असे पाप,
जो तुला विसरण्याचा मित्रांना दिलास तु शाप...!
आम्हा सर्वांना अचानक कसाकाय सोडून गेलास,
मित्रांनचा व घरच्यांनचा का नाय विचार केलास...!
देवा दुर्वेशकडून अशी कोणती चुक झाली,
जी त्याला एवढी भलीमोठी शिक्षा मिळाली...!
नकळत काय चुकले असेल माझ्या मित्राचे देवा,
तर त्याला माफ करुन दिल्या घरी सुखी ठेव रे देवा...!
तुझ्यासारखा मित्र विश्वात होणे नाही,
तुझ्याविना मैत्रीला काय अर्थच उरला नाही...!
विश्वास नाही बसत तु आमच्यात नसल्याचा,
भास होतो रे आम्हाला तू जवळ असल्याचा...!
तुला वेळोवेळी फोटोत पाहत राहीन,
नेहमी तुला माझ्या मनोमनी श्रद्धांजली वाहत राहीन...!
तुझी आठवण येणार नाही असे होणार नाही,
जिथे येईल तिथं तुझ्यासारखा शांत बसून राहिन...!
माझ्याशी न बोलता गेल्याची खंत मनी राहिलं,
तुझा चेहरा नेहमी डोळ्यासमोर येत राहील रे येत राहील...!😓
जिवनात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली.
तुच सांग मित्रा,भावा एवढं प्रेम मनात असताना. कसे काय विसरु तुला,तुच सांग मला,😰😰 जिथे आहेस तिथे सुखी रहा.🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🙏🙏

No comments:

Post a Comment